JE Camera Slideshow is closed

Text will come here. Text will come here. Text will come here. Text will come here. Text will come here. Text will come here. Text will come here. Text will come here. Text will come here. Text will come here. Text will come here. Text will come here. Text will come here.

योजनांची माहिती

योजनां विषयक माहिती

या कार्यालयाकडून खालील प्रकारच्या योजना हाती घेतल्या जातात.

१) लघु पाटबंधारे तलाव
लहान नाला/ लहान नदीवर मातीचा आडवा बांध घालून तलाव निर्माण केला जातो, तलाव बांधताना तलावात साठविलेले पाणी जमिनीखालून वाहून जावू नये यासाठी जलरोधी खंदक व बंधाऱ्यामधून पाणी वाहून जावू नये यासाठी गाभा भाराव केला जातो. तसेच भरावाच्या संरक्षणासाठी अश्मपटल , दगडी कोपरा याची तरतूद असते. याशिवाय भरावातील पाणी वाहून जाण्यासाठी गाळकाची तरतूद असते. नाला/नदीचा पावसाळ्यात येणारा पूर वाहून जाण्यासाठी तसेच धरण सुरक्षित राहावे यासाठी सांडवा बांधला जातो. तलावात साठविलेले पाणी कालव्याद्वारे लाभक्षेत्रात देण्यात येते .

२) साठवण तलाव
ज्या ठिकाणी लाभक्षेत्र सलग नसतो , तसेच चढ उताराचे असते त्या ठिकाणी साठवण तलाव बांधण्यात येतो. सदर बंधारा लघु पाटबंधारे तलावाप्रमाणे बांधण्यात येतो, या तलावास कालवा नसतो. परंतु नदीत पाणी सोडण्यासाठी विमोचक ठेवण्यात येते. यावरील सिंचन उपसा पद्धतीने केले जाते.

३)पाझर तलाव
लहान ओहोळ/ लहान नाल्यावर सदर तलाव बांधण्यात येतो. सदर तलाव मातीचा असून त्याचे बांधकाम लघु पाटबंधारे तालावाप्रमाणेच करण्यात येतो. परंतु या तलावाचा जालारोधी खंदक कमी खोलीचा ठेवण्यात येतो. त्यामुळे या तलावात साठविलेले पाणी जमीनेखाली पाझरून तलावाजवळील विहीरीमधील जलसाठ्यात वाढ होते. या तलावाचे प्रमुख उद्देश जलपुनर्भरणाचा आहे

४) कोल्हापूर पद्धतीचे बंधारे
को.प.बंधारा नदीवर संधानकात बांधता येतो. या बंधाऱ्यात साठविलेले पाणी मुख्यत्वेकरून नदी पात्रातच असतो. या बंधाऱ्याचा उंबरठा पातळीपर्यंत बांधकाम संपूर्ण असून त्यावर ठराविक २ मी. अंतरावर एल मीटर रुंदीचे स्तंभ असतात. या स्तंभांवर आवश्यकतेनुसार लहान रस्ता असतो. या बंधाऱ्यात १५ ऑक्टोबर अथवा सप्टेंबरच्या शेवटच्या आठवडयात पाणी साठवता येते. पाणी साठवण्यासाठी दोन स्तंभामध्ये लोखंडी दारे बसवण्यात येतात. ही द्वारे पावसाळ्यापूर्वी काढण्यात येतात. त्यामुळे नदीच्या पूराविसार्ग सुरक्षितपणे वाहून जातो. या बंधाऱ्यावरील सिंचन उपसा सिंचन योजनेद्वारे केले जाते.

५) वळण बंधारा
या बंधाऱ्याचा मुख्य उद्देश नदी/ नाल्यामधील प्रवाही पाणी शेतात वळवणे. हा बंधारा कमी उंचीचा असून त्याची साठवण क्षमता कमी असते . या बंधाऱ्याच्या संपूर्ण लाम्बीतून नदी / नाला पूरविसर्ग जाण्याची तरतूद असते. नदी / नाला यातून येणारे पाणी दोन्ही / एकाच बाजूस वळवून कालव्याद्वारे सिंचन केले जाते.

६) उपसा सिंचन योजना
भौगोलिक परिस्थितीमुळे जे लाभक्षेत्र कालव्याद्वारे प्रवाही सिंचनाने भिजू शकत नाही. अथवा जलस्त्रोतापासून लाभक्षेत्र उंचावर आहेत, त्या ठिकाणी उपसा सिंचन योजनेद्वारा सिंचन करण्यात येते. नदी/ नाला पात्रात किंवा तीरावर विहीर बांधून त्यात पाणी घेतले जाते व ते पाणी विद्युत/ डिझेल पंपाद्वारे नलीकामार्फत लाभक्षेत्रात पोहोचवले जाते. ते पाणी कालव्याद्वारे / उपसाद्वारे लाभक्षेत्रात दिले जाते. तसेच या प्रकारच्या व्यक्तिगत योजना त्यांच्या मालकीच्या विहिरीवर राबविल्या जातात.

७) जलबांध
ज्या नाल्याची रुंदी २० मी. अथवा त्यपेक्षा कमी आहे. तसेच नाला काठ दोन मीटरपेक्षा जास्त आहे व नाला पत्रात खडक आहेत, या ठिकाणी कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याऐवजी जलबांध प्रस्तावित करणे योग्य आहे. या जलबांधामध्ये २.०० मी. x १.२० मी. लोखंडी दरवाजे असून ते सर्व दरवाजे (एक व दोन सोडून) खालील बाजूस पडणारे असतात अ एक ते दोन वरील बाजूस पडणारे असतात. पावसाळ्यात आवश्यकतेनुसार दरवाजे बंद वा उघडणे आवश्यक आहे. यासाठी दोन अथवा तीन व्यक्तींची गरज लागते. लाभाधाराकांनी स्वखर्चाने दरवाजे उघडबंद करणे आवश्यक आहे.

८) गॅबियन बंधारे
या बंधाऱ्याचा मुख्य उद्देश भूगर्भातील पाण्याच्या पातळीची पुनर्भरणासाठी, अप्रत्यक्ष सिंचनासाठी व पाणी पुरवठा योजनांच्या तसेच नाला/ नदी पत्राजावालील विहिरींचा कायमस्वरूपी पाण्याच्या स्तोत्रात टिकून राहण्यासाठी पाण्याचा साठा निर्माण करणे. हा बंधारा नाला / नदी यांची पत्र रुंदी २० मी. इतकी अथवा त्यापेक्षा कमी आहे. तसेच बांधणे श्रेयस्कर असते